
रत्नागिरी शहराला सुरक्षित करण्याचे काम सुरू , सीसीटीव्ही जाळ्याचे काम २५ टक्के पूर्ण
रत्नागिरी शहरात सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे पसरविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. ठेकेदाराकडून कॅमेरा बसविण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेर किंवा जानेवारीला हा सीसीटीव्ही प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. याचबरोबर अनेक वर्षे बंद पडलेली आणि शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली सिग्नल यंत्रणाही सुरू करण्याचा प्रस्ताव पोलीस दलाने पालिकेला दिला. डिसेंबरमध्ये ही सिग्नल यंत्रणा सुरू होणार आहे.
औरंगाबाद शहराच्या धर्तीवर रत्नागिरी शहरामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्हीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या प्रयत्नातून हा १ कोटींचा प्रकल्प सुरू झाला आहे. यामध्ये शहरांतील सर्व प्रवेशद्वारांपासून सार्वजनिक ठिकाणे, महत्वाची ठिकाणे, किनारे, बंदर, जेटी, एसटी बसस्थानक, काही संवेदनशील भाग आदी ठिकाणी ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रजासत्ताकदिनी कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते या प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला. त्यासाठी ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील कंपनीने त्याचा ठेका घेतला आहे.
www.konkantoday.com