
मटण झटका असो वा हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे ते झटक्याने करा अगर पटक्याने करा,- रामदास आठवले.
मटण झटका असो वा हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे.झटक्याने करा अगर पटक्याने करा.पण नितेश राणे यांनी एवढी हार्ड भूमिका घेऊ नका असा प्रेमळ सल्ला केंदीय मंत्री रामदास आठवले यांनी नितेश राणेंना दिलाय.नितेश राणे यांनी झटका सर्टिफिकेट असलेले मटन विका असा मुद्दा मांडला आहे यावर उत्तर देताना रामदास आठवले यांनी त्याचा शैलीत उत्तर दिलं आहे.राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी फक्त हिंदू धर्मीय झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोंदणीसाठी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम नावाचं पोर्टल सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात यावरून राजकारण तापलं आहे.
एका संविधानिक पदावरील व्यक्तीने एकाच धर्माच्या लोकांकडून मटण खरेदी करण्याचं आवाहन करणं योग्य की अयोग्य असा प्रश्न उपस्थित झालेल असताना अल्पसंख्यांकमंत्री रामदास आठवले यांनी नितेश राणेंना मटण झटका असो की हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे. नितेश राणेंनी एवढी हार्ड भूमिका घेऊ नये असा सल्ला दिलाय.नितेश राणे यांनी झटका सर्टिफिकेट असलेले मटन विका असा मुद्दा मांडला आहे यावर उत्तर देताना रामदास आठवले यांनी त्याचा शैलीत उत्तर दिलं आहे.मटण झटका असो वा हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे.
झटक्याने करा अगर पटक्या ने करा.पण नितेश राणे यांनी एवढी हार्ड भूमिका घेऊ नका असा सल्ला देखील आठवले यांनी दिला आहे.मुसलमान आता हा देश सोडून जाऊ शकत नाहीत.त्यामुळे सर्व धर्म समभाव संविधान निर्माण झालं आहे त्याचा विचार करता मी नितेश राणे यांचा भूमिकेशी सहमत नसल्याचे आठवले यांनी सांगितले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य नव्हते या नितेश राणेंच्या वक्तव्यावर बोलताना रामदास आठवले यांनी नितेश राणे यांचं म्हणणं अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत त्यावेळी नितेश राणे ही नव्हते आणि मीही नव्हतो. इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख हे मुस्लिम होते असे पुरावे पुढे आलेले आहेत. अनेक शूर मुसलमान हे मुघलांच्या विरोधात लढलेले आहेत आणि हाच इतिहास असल्याचे आठवले यांनी सांगितल आहे.