
गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळ अडकून पडलेले सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघे उद्या, मंगळवारी संध्याकाळी पृथ्वीवर परतणार.
गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या भूतलावर परतण्याबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे.सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघे उद्या, मंगळवारी संध्याकाळी पृथ्वीवर परततील, अशी माहिती नासाने दिली.
या दोन अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सचे अंतराळयान क्रू-10 हे रविवारी चार अंतराळवीरांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. यामुळे, भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. नासाने रविवारी संध्याकाळी यासंदर्भात एक निवेदन जारी केले. क्रू-10चे समुद्रात स्प्लॅशडाऊन मंगळवारी संध्याकाळी सुमारे 5.57 वाजता होईल. म्हणजेच, भारतीय वेळेनुसार सुनीता विल्यम्स 19 मार्च रोजी पहाटे 3.30 वाजता भूतलावर परततील. यापूर्वी त्यांच्या परतीसाठी बुधवार निश्चित करण्यात आला होता. मात्र, हवामानाचा आढावा घेतल्यानंतर, मंगळवारी दोन्ही अंतराळवीरांना माघारी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नासा सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.