
जांभूळवाडी येथील चित्रकार शिवाजी डोईफोडे यांनी मोरपिसावर श्रीकृष्णाचे चित्र काढून आपली कला दाखवली
श्री कृष्णाच्या हातात बासरी आणि डोक्यावर मोरपीस धारण केलेले रूप सर्वांनाच भाळते. श्रीकृष्णाचे जन्मोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे जांभूळवाडी येथील चित्रकार शिवाजी डोईफोडे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मध्यरात्री मोरपिसावर श्रीकृष्णाचे चित्र काढून आपली कला दाखवली.चित्रकार शिवाजी डोईफोडे यांनी साकारलेल्या या चित्राचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.