
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १३७ बाल मृत्यूची नोंद
रत्नागिरी जिल्ह्यात मातामृत्यूचे प्रमाण कमी असले तरी बालमृत्यूचे प्रमाण पाहता गेल्या वर्षभरात ११७ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे. तर प्रसूतीदरम्यान २ मातांचा मृत्यू झाला आहे. परंतु राज्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्याचा मृत्यूदर कमी असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे. सध्या देशाचा बाल मृत्यूदर साधारण दरहजारी १० इतका आहे.
आरोग्य विभाग सातत्याने अर्भक आणि बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करत असल्यामुळे बालमृत्यूदरात घट होत आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्याचा बाल मृत्यूदर फारसा कमी होताना दिसत नाही. गेल्या दोन वर्षामध्ये हा मृत्यूदर जैसे थे आहे. २०२२-२३ मध्ये १८० बालकांचाा मृत्यू झाला होता. तर २०२३-२४ मध्ये १३७ बालकांचा मृत्यू झाला आहे.www.konkantoday.com