
छत्रपती शिवराय, संभाजीराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, राजापूर शहरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण, संबंधितावर गुन्हा दाखल.
बुधवारी होळी उत्सवात राजापूर शहरात जवाहर चौकात घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थ अबाधित राखत वातावरण शांत केलेले असताना व सर्व काही सुरळीत सुरू असताना शुक्रवारी सोशल मिडियावर तालुक्यातील नाटे गावातील अब्बास मोनये नामक एका समाजकंटकाने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याने राजापूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र पोलिसांनी या प्रकाराची तातडीने दखल घेत संबंधित समाजकंटकाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याने वातावरण निवळले आहे.दरम्यान, या समाजकंटकाच्या मोबाईल लोकेशनद्वारे शोध घेत पोलिसांचे विशेष पथक त्याच्यापर्यंत पोहचून त्याला जेरबंद करण्यात यशस्वी होईल, असा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे.www.konkantoday.com