
कोंकण रेल्वे मराठी भाषेचा विसर! दिवा रत्नागिरी ट्रेन मध्ये मराठी भाषेत फलकच नाही!!
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु त्यानंतरही मराठीचा द्वेष करणारे आजही उजळ माथ्याने फिरत आहेत.(शनिवार दि १५ मार्च) दिवा रत्नागिरी पॅसेंजर गाडीने प्रवास करणा-या सौ श्वेता बाईत या प्रवासी महिलेने या बद्दल चा एक व्हिडिओ करुन कोंकण रेल्वे प्रशासनाचा मराठी द्वेष उघड केला आहे.
दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी पॅसेंजर गाडी हि महाराष्ट्राशिवाय कोणत्याही परराज्यातुन प्रवास करत नाही. असे असतानाही आपात्कालिन खिडकी असे मराठीत लिहिणे अपेक्षित असताना कन्नड हिंदी आणि इंग्रजीत लिहिण्यात धन्यता मानली आहे. यावरुन एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध होत आहे की कोंकण रेल्वे ला महाराष्ट्राशी काहीही घेणे देणे नाही.