दापोलीतील सुलेमान मुस्तफा खान यांना पीएचडी प्रदान.

दापोली : दापोलीसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. दापोलीचे रहिवासी असलेले डॉ. सुलेमान मुस्तफा खान यांना त्यांच्या संशोधनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांच्यावर दापोली मधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.त्यांचा संशोधन विषय होता, “उन्हाळी आफ्रिकन झेंडूच्या वाढीवर, उत्पन्नावर आणि गुणवत्तेवर ह्युमिक ऍसिड आणि जिबरेलिक ऍसिडचा प्रभाव.”हे संशोधन फुलशेती आणि लँडस्केप आर्किटेक्चर क्षेत्रात महत्त्वाचे ठरले आहे.

डॉ. डी. एम. पंचभाई यांनी त्यांना मार्गदर्शन केले.सध्या डॉ. खान अबू धाबी येथे एका नामांकित कंपनीत लँडस्केप इंजिनियर म्हणून काम पाहत आहेत.डॉ. खान यांचे शालेय शिक्षण दापोलीतील यू. ए. दळवी हायस्कूलमध्ये झाले.त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण दापोलीच्या नॅशनल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण झाले.त्यांनी कुडाळ येथील महाविद्यालयातून उद्यानविद्याची (हॉर्टिकल्चर) पदवी घेतली.त्यानंतर, त्यांनी कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले.या संशोधनात त्यांनी ह्युमिक ऍसिड आणि जिबरेलिक ऍसिड (GA3) चा झेंडूच्या वाढीवर, उत्पन्नावर आणि गुणवत्तेवर होणारा प्रभाव तपासला.त्यांनी या दोन्हींची योग्य मात्रा निश्चित केली आणि उपचारांचे खर्च-लाभाचे प्रमाण ठरवले.उन्हाळ्यात झेंडूच्या पिकाला येणारी आव्हाने लक्षात घेता, हे संशोधन शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

डॉ. खान यांनी दाखवून दिले की, योग्य रासायनिक वापराने फुलांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते.या यशाबद्दल कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कुलगुरू डॉ. संजय भावे, प्रमोद सावंत आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू व पत्रकार मुश्ताक खान यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.उन्हाळ्यात झेंडूच्या पिकाला येणारी आव्हाने लक्षात घेता, हे संशोधन शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल.त्यांच्या या कामगिरीमुळे दापोलीकरांना अभिमान वाटत आहे. हे संशोधन शेती क्षेत्रात नवीन दिशा देईल, अशी आशा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button