
मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, देहविक्री करणाऱ्यांमध्ये 4 अभिनेत्रींचा समावेश; दलाल अटकेत.
मुंबईत पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान चार महिलांची सुटका करण्या आली आहे. तसंच एका दलालाला अटक करण्यात आली आहे. पवई परिसरात हे सेक्स रॅकेट चालवलं जात होतं.पोलिसांना येथे सेक्स रॅकेट सुरु असल्याची टीप मिळाली होती. त्याआधारे धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, सेक्स रॅकेटमध्ये सहभागी या महिला अभिनेत्री आहेत. मनोरंजन क्षेत्रात आपलं नाव कमावण्यासाठी त्या संघर्ष करत आहेत.पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारे आम्ही हॉटेलमध्ये सापळा रचला आणि महिलांना देहविक्री व्यवसायात ढकलणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
त्याची ओळख श्याम सुंदर अरोरा अशी पटली आहे. यादरम्यान चार स्टगलर्स अभिनेत्रींची सुटका करण्यात आली”. यामधील एका पीडितेने हिंदी टीव्ही सीरिअलमध्ये काम केलं आहे.आरोपी आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध पवई पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं आणि या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.