
नाशिकमधील हिंदू खाटिक समाजाने ‘हलाल’ मटणच विक्री करण्याचा निर्धार करत मंत्री नितेश राणे यांना ‘झटका’ दिला
नाशिकमधील हिंदू खाटिक समाजाने ‘हलाल’ मटणच विक्री करण्याचा निर्धार करत मंत्री नितेश राणे यांना ‘झटका’ दिला आहे. खाटिक समाजाला व्यवसायासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही.शास्त्रीयदृष्ट्या खाण्यास अयोग्य असलेले झटका मटण हे महाराष्ट्रात कोणीही स्वीकारणार नाही.
महाराष्ट्रात ‘हलाल’चाच पुरस्कार समस्त खाटिक समाजातील बांधव करतील, असा निर्धार व्यक्त करत धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही धिक्कार करतो, अशा शब्दांत राणे यांच्या भूमिकेचा नाशिकमधील खाटिक समाजाने निषेध केला आहे.
राणे यांच्या एका घोषणेमुळे राज्यात ‘हलाल’विरोधात ‘झटका’ मटण असा वाद सुरू झाला आहे. हलाल मटणाला विरोध करत हिंदूंसाठी झटका मटण विक्रीसाठी ‘मल्हार’ प्रमाणपत्रासह मांसविक्री करणारी दुकाने उघडली जातील. हिंदूंनी त्याच दुकानांमधून मटण खरेदी करावे, असे आवाहन राणे यांनी केले आहे. राणे यांच्या या भूमिकेला राज्यभरातून विरोध होत आहे. नाशिकमधील खाटिक समाजानेदेखील बैठक घेत राणे यांच्या भूमिकेचा निषेध केला आहे.