
धुळवडीचा रंग धुण्यासाठी पाण्यात उतरलेल्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू; मुंबईतील घटना.
होळी व धुलिवंदनाचा आनंद असतानाच, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रंग खेळून झाल्यानंतर तो रंग धुवून काढण्यासाठी नदीत उतरलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहेबदलापूर येथे ही दुःखद घटना घडली. उल्हास नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने या चौघांचा बुडून मृत्यू झाला.
धुळवड खेळल्यानंतर आर्यन मेदर (वय १५), आर्यन सिंग (वय १६), सिद्धार्थ सिंग (वय १६) आणि ओमसिंग तोमर (वय १५) हे चौघे विद्यार्थी रंग काढण्यासाठी उल्हास नदीत उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने या चौघांनीही जलसमाधी मिळाली. गटांगळ्या खात असताना ही गोष्ट इतरांच्या लक्षात आली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. बदलापूरच्या चामटोली परिसरात ही घटना घडली.