
तीन दिवस शासकीय सुट्या असल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी सणासाठी कोकणात.
होळीनंतर पुढील पाच दिवस कोकणातील गावांमध्ये पालख्या काढण्यात येतात. यासाठी शुक्रवारी हजारो चाकरमानी कोकणातील त्यांच्या मूळगावी निघाले. त्यामुळे शुक्रवारी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगांच रांगा लागल्या होत्या.माणगाव आणि टेमपाले या दोन ठिकाणी तर तब्बल पाच किमी प्रवासासाठी दीड तासाचा कालावधी चाकरमान्यांना लागत होता.होळी दहन गुरुवारी रात्री करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी धुलिवंदन सण साजरा करून पुढील पाच दिवस कोकणातील प्रत्येक गावी संपूर्ण गावात गावदेवीची पालखी मिरवणूक निघणार आहे. आता सलग तीन दिवस शासकीय सुट्या असल्याने मोठ्या संख्येने नागरिक या सणासाठी कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे महामार्गावर छोट्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ होती