स्वयंघोषित काही सोशल मिडिया हँडल्सनी वातावरण बिघडवू नये-आ.निलेश राणे


कोकणात सगळेच सण उत्सव शांततेत साजरे होतात, राजापुरातील स्थिती सुद्धा आटोक्यात आली असून आम्ही असेपर्यंत कोकण पेटवू देणार नाही असे सांगत स्वयंघोषित काही सोशल मिडिया हँडल्सनी वातावरण बिघडवू नये असे आवाहन माजी खासदार कुडाळ मालवणचे आ.निलेश राणे यांनी केले आहे.

बुधवारी रात्री राजापूर येथील धोपेश्वर देवस्थानची होळी असताना काही होळीच्या मार्गावर एका ठिकाणी येऊन दोन गटात वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध ठिकाणाहून याबाबत गैरसमज पसरवणारे चुकीचे चित्र रंगवणारे पोस्ट वीडियो व्हायरल झाले होते. यात कोकण पेटले आहे असे दाखवण्यात येत होते. या सगळ्या गोष्टीचा समाचार आ. निलेश राणे यांनी संचार घेतला. याबाबतचा वीडियो त्यांनी त्यांच्या एक्स हँडल वरून प्रसारित केला. त्यात आ. राणे म्हणाले, राजापूर तालुक्यातील धोपेश्वर येथील होळी ही तालुक्यातील सर्वात मोठी होळी असं मानलं जातं. या होळीचा नेण्याचा अनेक वर्षांपासून एकच आणि पूर्वापार ठरलेला आहे. दरवर्षी या मार्गावरून जाताना होळी एका विशिष्ट ठिकाणी थांबते. यावर्षी त्या मार्गावर जात असताना या विशिष्ट ठिकाणी जिथे होळी थांबते तिथे थांबली पण गेट बंद होतं. त्यांनंतर वातावरण बिघडले आणि घोषणा देण्यात आल्या. गेटच्या दोन्ही बाजूने बाचाबाची झाली. याचवेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर आता हा विषय पोलीस स्थानकापर्यंत गेलेला असून पोलीस त्यांच्या पद्धतीने त्यावर मार्ग काढत आहेत. मात्र काही पत्रकार आणि सोशल मीडियातल्या काही हँडल्सनी, काही नेत्यांनी त्यांच्या हँडल्सवरून या धोपेश्वरच्या होळीतील वादावर कोकण पेटलं आहे असे चित्र दाखवला सुरुवात केली. धोपेश्वर होळी दरम्यान घडलेल्या घटनेतील ठराविक भाग दाखवण्यात येत आहे असे आ. निलेश राणे म्हणाले.आ. राणे म्हणाले कोकणात सगळे सण हे आनंदाने साजरे होतात आणि याहीपुढे आनंदाने साजरे होतील. आम्ही असेपर्यंत कुठल्याही सणामध्ये बाधा आणणारी कुठलीही घटना होणार नाही. मात्र या घटनेमध्ये काही लोकांना हे वातावरण बिघडवायचे होते, पेटवायचे होते तर त्यामुळे त्याच घटनेच्या वेळी पोलिसांनी सगळी परिस्थिती आटोक्यात आणली असतानाही ठराविक वीडियो व्हायरल करून राजापूर पेटलं, रत्नागिरी कोकण पेटल अस दाखवण्याचा प्रयत्न केला . मात्र कोकणात आणि विशेषतः रत्नागिरीत होळी शिमगा हा मोठा सण आहे. हा सण इथे आनंदाने साजरा होतो. या सणात इतके वर्ष काहीही झाले नाही, याही पुढे होऊ देणार नाही अशी ग्वाही आ. निलेश राणे यांनी दिली. पण लोकांची सोशल मीडियावरील होणारी बदनामी थांबवावी, काही स्वयंघोषित पत्रकारानी या घटनेनंतर मी शांतता मार्च करणार आहे अशा बातम्या पसरवायला सुरुवात केली आहे. पण अस काही नाहीय, ज्यांना इथले वातावरण चिघळवायचं आहे त्यांची ही कामे आहेत, पण कोकण आणि राजापूर शांत आहे. उगीच चुकीच्या बातम्या देऊ नका असे आ. राणे म्हणाले.

मी राजापुरातील लोकांशीही बोललो आहे. नेते किंवा पत्रकार अशा प्रकरणात अडकत नाहीत तर गरीब तरुण मुले यात अडकतात, त्यांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होतो, कोर्ट कचेऱ्या होतात कुटुंबावर परिणाम होतो याची जाणीव करून दिली आहे. आता राजापुरातील सगळी परिस्थिती आटोक्यात आहे. पण ज्यांना मुद्दाम परिस्थिती बिघडवायची असेल तर तसे त्यांना मी करू देणार नाही. असे काही घडले तर दोन गटांच्या मधे मी उभा राहीन पण कोकण तिच्या संस्कृती परंपरेसह शांतच राहील अशी आश्वासक ग्वाही निलेश राणे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button