
सोशल मिडीया व वृत्तपत्रांमध्ये अफवा न पसरविण्याबाबत जिल्हा पोलिसांचे आवाहन
सोशल मिडीया व वृत्तपत्रांमध्ये आक्षेपार्ह दृश्ये / फोटो / व्हिडीओ तसेच अफवा“न पसरविण्याबाबत” आवाहनरत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे समाजातील सर्व स्तरातील नागरीकांना आवाहन करण्यात येतेकी, कोणीही कोणत्याही प्रकारच्या समाजमाध्यमांवर एैतिहासिक व थोर पुरुष, घटनात्मक उच्च पदावरीलसन्माननीय व्यक्ती, राजकीय व्यक्ती अथवा इतर समाजातील व्यक्तींच्या संदर्भात भावना दुखावतील अशाअनुषंगाने आक्षेपार्ह पोस्ट करु नयेत. तसेच स्टेटस ठेवू नयेत.सोशल मिडीयावर सायबर पोलीस ठाणे रत्नागिरी मार्फत २४४७ निगराणी ठेवण्यात येत आहे.सोशल मिडीयाव्दारे कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अगर आक्षेपार्हसंदेश, व्हिडीओ प्रसारीत केल्यास रत्नागिरी पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्यात येईल. कोणत्याहीप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा बळी पडू नये.facebook, X, Instagram, WhatsApp अथवा youtube या समाजमाध्यमांवर अशा आक्षेपार्हपोस्ट / स्टेटस करणा-या व्यक्तींचे रेकॉर्ड तयार होऊन त्यांचेवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे अशीसमाजमाध्यमे वापरणारे तरुणवर्ग व इतर यांनी आक्षेपार्ह पोस्ट करु नये व आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करु नयेअथवा लाईक करु नये.रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे असेही आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारच्या आक्षेपार्हपोस्टमुळे गुन्हे दाखल होऊन संबंधितांना भारतीय न्याय संहिता, महिती तंत्रज्ञान कायदया नुसार कायदेशिरप्रक्रियेला सामोरे जाऊ लागू शकते. यातुन तरुण वर्ग व इतरांचे भवितव्य अडचणीत येऊ शकते. तरीसमाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह पोस्ट स्वतःहुन तात्काळ डिलीट कराव्यात अथवा फॉरवर्ड व लाईक करु नयेत.सोशल मिडीया वर प्रसारीत करण्यात येणा-या पोस्ट व वृत्तपत्रांमध्ये प्रसारित केल्या जाणा-या बातम्या याप्रसारीत करण्यापूर्वी संबंधित विभागा कडून खात्री करून घेण्यात यावी सर्व समाजातील प्रतिष्ठित जणांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारच्या पोस्ट समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊ नये यासाठी अशा प्रकारे आपणा मार्फत जागृती करण्यात यावी व जिल्ह्यात जातीय सलोखा कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे