
सह्याद्री निसर्ग मित्रच्या भाऊ काटदरे यांना वसुधरा साथी सन्मान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विलेपार्ले, मुंबई येथे २५ वा. म. टा. सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश धनंजय रिसबूड, ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळे आणि कोकण किनार्यावर कासव संवर्धनासाठी कार्य करणार्या भाऊ काटदरे यांचा सन्मान केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र टाइम्स महाराष्ट्राच्या जडणघडणीत साक्षीदार असून अनेक पुरस्कारांच्या मांदियाळीत उठून दिसणारा पुरस्कार म्हणून म.टा. सन्मानाचे नाव घेतले.www.konkantoday.com