
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात भोंग्यांची तपासणी सुरू.
राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात विविध प्रार्थनास्थळांवरील भोग्यांची माहिती घेत त्याबाबत परवानगी तपासणीची कार्यवाही सुरू झाली आहे. येत्या आठवडाभरात त्याचा अहवाल प्राप्त होईल, त्यानंतर पुढील कार्यवाही जिल्हा पोलीस दलामार्फत केली जाणार आहे.शासनाकडून विविध प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयालाही त्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत (ध्वनीक्षेपक) माहिती घेण्याची कार्यवाही पोलिसांमार्फत सुरू झाली आहे. तसेच आवाजावरही मर्यादा ठेवण्याबाबत ताकीद दिली आहे.
कायद्यानुसार त्या त्या दिवसांसाठी ध्वनिक्षेपकाची परवानगी दिली जाते. कायमस्वरूपी लावण्यााची परवानगी दिली जात नाही. यावरून विविध प्रार्थनास्थळांवरील भोंगे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट संकेत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिले. विधानसभेत मंगळवारी आमदार देवयानी फरांदे व अतुल भातखळकर यांनी विविध प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाची लक्षवेधी केली होती. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विविध प्रार्थनास्थळांवरील भोग्यांना परवानगी आहे का, आवाजाच्या मर्यादा पाळल्या जातात आदींबाबत माहिती घेण्याचा आदेश पोलीस यंत्रणेला दिला आहे.www.konkantoday.com