
भूमिगत वाहिन्यांच्या कामाने ग्रामस्थ त्रस्त.
सध्या तालुक्यात महावितरण आणि महानेटच्या भूमिगत वाहिन्यांचे काम वेगाने सुरू आहे. ठेकेदार स्थानिक प्रशासनाला, ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम करत असल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा देखील कंत्राटी काम असल्याने दुलक्ष करीत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने होणार्या या कामावर नक्की अंकुश कोणाचा आहे का असा प्रश्न सध्या तालुकावासियांकडून उपस्थित केला जात आहे.रस्त्याच्या कडेने खोदाई करून भूमिगत वाहिन्या टाकण्याच्या कामात ठेकेदाराकडून सुरक्षेचे कोणतीही मार्गदर्शक तत्वे पाळली जात नाहीत.
गुहागर तालुक्यातील असगोली गावातील तीव्र उताराच्या अरूंद रस्त्यावर खोदाई केलेली माती टाकल्याने दुचाकीस्वार घसरून पडले. गुहागर शहरात रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात पडून असगोलकर नावाचा तरूण गंभीर जखमी झाला. आजही हा तरूण रूग्णालयात उपचार घेत आहे. गुहागर शहरातील खालचापाट परिसरात खोदाईचे काम करताना जलवाहिनी फुटली. पालशेतमध्ये गटारातच खोदाई सुरू होती. हे थांबविण्याचा प्रयत्न करणार्या ग्र्रामस्थांना ठेकेदार कंपनीच्या महिला अधिकार्याने केली होती.www.konkantoday.com