
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भांडारपाल विरुद्ध गुन्हा दाखल
बेहिशोबी मालमत्ता असल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिणचे तत्कालीन भांडारपाल अशोक नाचणकर यांच्या विरुद्ध व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा सुमारे १कोटी ७३लाख ५६रुपयांची रक्कम अधिक असल्याचे लाचलुचपत विभागाने
तक्रारीत म्हटले आहे. नाचणकर हे भांडारपाल म्हणून २००३ ते २०१५ या कालावधीत काम करीत असताना त्यांनी या काळात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याचे आढळून आले त्यांना खुलासा करण्यासाठी वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या.परंतु ते त्यांचे कुटुंबीय कोणीही खुलासा करण्याकरता आले नाहीत.यामुळे नाचणकर व त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांविरुद्ध लाचलुचपत विभागाने तक्रार केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com