
संजय गांधी व श्रावणबाळ सेवा योजना बँक खाते संलग्न असलेल्या खात्यात अर्थसहाय्य निष्क्रीय खाते सक्रीय करण्याबाबत पाठपुरावा
रत्नागिरी, दि. 13 : शासनाने माहे डिसेंबर 2024 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलवरुन करण्याचा निर्णय घेतल्याने ज्या लाभार्थ्याचे आधार कार्ड हे ज्या बँक खात्याशी संलग्न असेल, त्या खात्यामध्ये त्या त्या महाचे अर्थसहाय्य मंत्रालयीन स्तरावरुन जमा झालेले आहे. तालुक्यातील 1111 लाभार्थी हे शासनाने तयार केलेल्या पोर्टलमध्ये दुबार आधार म्हणून निष्क्रीय दिसत आहेत. अशा लाभार्थ्याबाबत जिल्हा स्तरावरुन, तालुका स्तरावरुन मंत्रालयात वारंवार ईमेल, दूरध्वनीवरुन तसेच पत्रव्यवहाराने संपर्कात आहेत. ही बाब ही तांत्रिक आहे. लाभार्थ्यांचे आधार दुबार अशी त्रुटी येत असल्याने सदर लाभार्थी हे शासनाने तयार केलेल्या पोर्टलमध्ये निष्क्रीय दिसत आहेत.
या तांत्रिक अडचणीबाबत कार्यालयाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत असताना लाभार्थ्याचे आधार कार्ड दुबार अशी त्रुटी दाखवत आहे.तालुक्यातील 1111 लाभार्थी हे शासनाने तयार केलेल्या पोर्टलमध्ये दुबार आधार म्हणून निष्क्रीय दिसत आहे. या लाभार्थ्याबाबत जिल्हा स्तरावरुन, तालुका स्तरावरुन मंत्रालयात वारंवार ईमेल, दुरध्वनीवरुन तसेच पत्रव्यवहाराने संपर्कात आहेत.
सदरची बाब ही तांत्रिक आहे. लाभार्थ्यांचे आधार दुबार अशी त्रुटी येत असल्याने सदर लाभार्थी हे शासनाने तयार केलेल्या पोर्टलमध्ये inactive दिसत आहेत. सदरच्या तांत्रीक अडचणी बाबत कार्यालयाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत असताना लाभार्थ्याचे आधार कार्ड दुबार असा error दाखवत आहे. याबाबत जिल्हा कार्यालयाकडून व तालुका कार्यालयाकडून कोणतेही दुर्लक्ष झालेले नसुन लाभार्थ्याचे दुबार आधार कार्ड error ही तांत्रीक बाब आहे त्यांचे निराकरण करणेबाबत पाठपुरावा करुन शिल्लक लाभार्थ्यांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा करणेबाबत शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे. 24 तास या युटयुब चॅनलवर” तीन महिन्यापासून दिव्यांग बाधवांचा निराधार भत्ता रखडला” अशी बातमी प्रसारीत झालेली आहे. त्याबाबत उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी माहिती दिली आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शासनाच्या आदेशान्वये रत्नागिरी जिल्हयात संजय गांधी योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड करण्याचे काम तहसील व जिल्हास्तरावर गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. यामध्ये 98.5% लाभार्थ्याचा डेटा डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेचा लाभ लाभार्थ्याला तात्काळ मिळण्याकामी जिल्हयातील सर्व संगायो कर्मचारी सदरचे काम करीत आहे. जिल्हयातील लाभार्थ्याना महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल यांच्या मार्फत वेळोवेळी पत्रव्यवहार करुन आपले आधार कार्ड अपडेट करुन बँक खात्याशी संलग्न करणेच्या सूचनाही दिल्या आहेत.
याबाबत जिल्हा कार्यालयाकडून व तालुका कार्यालयाकडून कोणतेही दुर्लक्ष झालेले नसून लाभार्थ्याचे दुबार आधार कार्ड त्रुटी ही तांत्रिक बाब आहे, त्यांचे निराकरण करण्याबाबत पाठपुरावा करुन शिल्लक लाभार्थ्यांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा करण्याबाबत शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाकडून कळविण्यात आले आहे.000