
शिमगोत्सवासाठी उधना-मंगळूर स्पेशलला अतिरिक्त डबा वाढवला.
शिमगोत्सवासह उन्हाळी सुट्टी हंगामासाठी २ मार्चपासून चालवण्यात येत असलेल्या उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलला तात्पुरत्या स्लीपर श्रेणीचाा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. ०९०५७/०९०५८ क्रमांकाची उधना-मंगळूर द्विसाप्ताहिक स्पेशल २९ जूनपर्यंत धावणार आहे. २२ डब्यांच्या स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याने चाकरमान्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. स्पेशल उधना येथून रात्री ८ वा. सुटून दुसर्या दिवशी सायंकाळी ७.४५ वा. मंगळूर पोहचते. परतीच्या प्रवासात मंगळूर येथून रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटून दुसर्या दिवशी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी उधना येथे पोहोचते.www.konkantoday.com