
लोटेतील काही उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप, पोलीस कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षकांकडे गार्हाणे.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचे, त्यांना नाहक त्रास देण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत. या विरोधातील तक्रारी उद्योजकांनी नुकत्याच लोटे दौर्यात कोकण परिक्षत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्यासमोर मांडल्या. यावर कुठल्याही उद्योजकांना कोणी व्यक्ती अथवा संघटना विशिष्ट हेतूने नाहक त्रास देवून ब्लॅकमेलिंग करत असतील तर त्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असे आश्वासन दराडे यांनी उद्योजकांना दिले.कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दराडे यांनी नुकतीच लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्योग भवन येथे भेट दिली.
यावेळी लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्यावतीने पोलीस महानिरीक्षक दराडे यांचा सन्मान करण्यात आला. उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ऍड. राज आंब्रे यांनी प्रास्ताविकात लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना भेडसावणार्या विविध समस्यांचा गोषवारा केला आणि पोलीस निरीक्षकांना या बाबत लक्ष घालून सहकार्य करण्याची विनंती केली.www.konkantoday.com