
सावर्डेत निखळ आनंद या शॉर्ट फिल्मचा शुभारंभ
सावर्डेतील उद्योजक सचिनशेठ पाकळे यांच्या निवासस्थानी (निखळ आनंद) या लघुपटाचा शुभारंभ चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. सदरची निखळ आनंद शॉर्ट फिल्म शासनाच्या हिरकणी योजनेसाठी दिशादर्शक ठरेल, अस कौतूक गौरवोदगार निकम यांनी या वेळी काढले. या वेळी निर्माते सचिनशेठ पाकळे व कुटुंबिय, दिग्दर्शक गणेश मोडक, अनिरूद्ध निकम, उपसरपंच जमीर मुल्लाजी, उद्योजक साजन कुरसिंघल आदी मान्यवर उपस्थित होते. या शॉर्ट फिल्ममध्ये सावर्डेतील उद्योजक संजयशेठ पाकळे यांची कन्या सारा पाकळे हिची प्रमुख भूमिका आहे.
www.konkantoday.com