
रत्नागिरी शहरातील चर्मालय येथे एसटी-दुचाकीमध्ये धडक, स्वार जखमी.
रत्नागिरी शहरातील चर्मालय येथे एसटी आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. राहुल सुरेश तेरवणकर (३६, रा. कारवांचीवाडी) हा गंभीररित्या जखमी झाला. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या राहुल याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. एसटी ही कोकण नगरवरून मारूती मंदिरच्या दिशेने येत होती. तर दुचाकीस्वार चंपक मैदान येथून साळवी स्टॉपच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहने चर्मालय येथे आली असता हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. या अपघाताची नोंद रत्नागिरी पोलिसांत करण्यात आली आहे.www.konkantoday.com