
रत्नागिरी जिल्ह्यातील ४९५ कंत्राटी शिक्षक मानधनाविना
जिल्ह्यात ऑक्टोबर २०२४ व जानेवारी २०२५ मध्ये जिल्हा परिषद मराठी शाळांवर स्थानिक डी.एड., बी.एड. धारकांची कंत्राटी शिक्षक म्हणून भरती करण्यात आली. मात्र अद्यापही जिल्ह्यातील ४९५ कंत्राटी शिक्षकांना मानधन मिळालेले नसल्याची माहिती शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली. एकीकडे कार्यमुक्तीची टांगती तलवार तर दुसरीकड मानधन नसल्याने सरकार दरबारी निवेदन देवूनही या शिक्षकांना अपयश आले आहे.
यामुळे १७ मार्चला मंबईत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सुदर्शन मोहिते यांनी दिली.माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी युती सरकार असताना १० पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत एक कंत्राटी शिक्षक देण्याचा शासन निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यात १४ आॉक्टोबर २०२४ रोजी १०९ तर ८ जानेवारी २०२५ रोजी ३८६ व ४ शिक्षक नगरपरिषदांचे अशा एकूण ४९५ कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. www.konkantoday.com