
प्रशासनाचा कारभार गतीमान करण्यासाठी राज्यातील १२५ उपजिल्हाधिकार्यांना निवडश्रेणी.
राज्यातील महसूल प्रशासन गतिमान करण्यासोबतच अधिकारी व कर्मचार्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यातील १२५ उपजिल्हाधिकार्यांना निवडश्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील ८० अधिकार्यांचा अतिरिक्त जिल्हाधिकारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शंभर दिवसांच्या आराखड्यातील हा महत्वपूर्ण निर्णय असून, गेली आठ ते नऊ वर्ष हा निर्णय रखडला होता. यामुळे राज्यातील महसूल विभागातील कार्यशैलीला प्रोत्साहन मिळणार आहे. सोमवारी हा शासन निर्णय जारी करण्यात आला.www.konkantoday.com