
दापोली तालुक्यातील अडखळ मोहल्ला इथं दोन समाजातील गटामध्ये हाणामारी, वातावरण तंग, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त
दापोली तालुक्यातील अडखळ मोहल्ला इथं अडखळ तरीबंदर इथं बसण्याच्या जागेवरून दोन समाजातील लोकांमध्ये दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. अडखळ मोहल्ला इथं ही घटना घडली आहे.दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आहे. दापोलीतील अडखळ मोहल्ला इथं बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. अडखळ तरीबंदर इथं बसण्याच्या जागेवरून दोन समाजातील गटात लोकांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीमध्ये झालं. याचे पर्यावसान जोरदार दंगलीमध्ये पाहायला मिळाले. पाजपंढरी येथील जमाव मोठ्या प्रमाणात अडखळ मोहल्ला इथं घुसला. या जमावाने दगड,काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला केला.
या घटनेमध्ये अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते. रात्री उशिरा आठ जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं आहे. मात्र हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.रत्नागिरी येथून दंगल प्रतिबंधक जादा पोलीस दल दापोलीत पाठवण्यात आले आहे. तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अडखळ येथे जावून परिस्थितीची पहाणी केली. सध्या या ठिकाणी तणाव पुर्ण शांतता असून रात्री या दोन्ही गटाच्या शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सध्या या ठिकाणी तणाव पूर्व शांतता आहे