
आयुष्मान भारत योजनेचे निकष बदलणार? ‘या’ वयाच्या नागरिकांना मिळणार आरोग्य सुविधांचा फायदा!
केंद्र सरकारद्वारे नागरिकांसाठी अनेक आरोग्यसंबंधित योजना राबवल्या जातात. यापैकीच एक आयुष्यमान भारत योजना आहे. देशभरातील कोट्यावधी नागरिक या योजनेचा लाभ घेतात. मात्र, आता योजनेत मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे.*मोदी सरकारने या योजनेचा लाभ 70 पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला होता. या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी सरकारकडून आयुष्मान भारत वय वंदन कार्ड दिले जाते. मात्र, आता योजनेची वयाची अट बदलण्याची शक्यता आहे.संसदीय समितीने आयुष्मान भारत वय वंदन कार्डची वयोमर्यादा 70 वर्षांवरून 60 वर्षे करण्याची शिफारस केली आहे.
रिपोर्टनुसार, संसदीय समितीने आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी लोकांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीकडे शिवाय सरसकट लाभ देण्यात यावा असे म्हटले आहे. तसेच, योजनेअंतर्गत उपचारांची रक्कम 5 लाख रुपयांवरून 10 लाख रुपये करण्याची शिफारस केली आहे.समितीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, अनेक महागड्या आणि उच्च दर्जाच्या प्रक्रिया आणि अगदी उच्च-स्तरीय निदानांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट केलेले नाही. या योजनेत सीटी, एमआरआय आणि न्यूक्लियर इमेजिंग यांचा समावेश करण्याची शिफारस देखील समितीकडून करण्यात आली आहे.
आयुष्मान कार्ड’ बनवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ‘आयुष्मान’ ॲप डाउनलोड करा.ॲप डाउनलोड मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.त्यानंतर तुमची पात्रता तपासा.पात्र असाल तर आधार ई-केवायसी करा.आता फोटो अपलोड करा. या प्रक्रियेनंतर तुमचे ‘आयुष्मान कार्ड’ तयार होईल. तुम्ही mera.pmjay.gov.in या वेबसाइटवरून देखील कार्ड डाउनलोड करू शकता.