
रत्नागिरी उपकेंद्रात पर्यटन व संवर्धन विषयावर रत्नागिरीत चर्चासत्र.
चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या रत्नागिरी उपकेंद्रात पर्यावरणपूरक पर्यटन आणि संवर्धन या विषयावर नुकतेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात पर्यावरण, रसायनशास्त्र आणि प्राणीशास्त्र विद्या शाखेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. चर्चासत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वन्यजीव रक्षक प्रा. नागेश दफ्तरदार यांनी निसर्ग संवर्धन आणि पर्यटन यांच्या सहसंबंधावर प्रकाश टाकला. जबाबदार पर्यटन पद्धती आणि नैसर्गिक वारसा जतन करण्याचे महत्व त्यांनी सांगितले. पर्यटन वाढवणे व पर्यावरणाचे रक्षण करणे यातील समतोलावर त्यांनी जोर दिला. स्थानिकांचा सहभाग आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची गरज त्यांनी स्पष्ट केली. यानंतर कांदळवन क्षेत्रातील तज्ञ वैभव बोंबले यांनी कांदळवन संवर्धन आणि स्थानिक लोकांच्या उपजिविकेशी असलेला त्यांचा संबंध यावर माहिती दिली. रत्नागिरी वन विभागाचे गावडे यांनी वन विभागाच्या माध्यमातून संवर्धनासाठी केल्या जाणार्या प्रयत्नांची माहिती दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ क्षेत्रीय अधिकारी अमित लोटे यांनी प्लॅस्टिकच्या वापराचे दुष्परिणाम आणि निसर्ग संवर्धनाची गरज यावर व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक पद्धती वापरण्याचे आवाहन त्यांनी केले. या चर्चासत्राचे आयोजन पर्यावणशास्त्र विभागाचे डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले होते.www.konkantoday.com