अलिबाग वेलफेयर ट्रस्ट च्या माध्यमातून तयार करण्यात आलेली शववाहिनी सुपूर्द

अलिबाग (राजेश बाष्टे ):-अलिबाग वेलफेयर ट्रस्ट च्या माध्यमातून तयार करण्यात आलेली शववाहिनी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व अलिबाग वेलफेयर ट्रस्ट चे अध्यक्ष प्रसाद जोग यांच्या हस्ते श्री. विश्वास खोत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. ही शववाहिनी सर्व धर्मीयांसाठी उपलब्ध राहणार आहे. यावेळी मुख्याधिकारी महेश चौधरी, सभापती ॲड. गौतम पाटील, नगरसेवक अजय झुंजारराव, महेश शिंदे, आकाश जोग, कौस्तुभ कुलकर्णी, आशिष मांधळे आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button