
मराठीवर असा भेदभाव केला तर यापुढे एकही एअरटेलची गॅलरी दिणार नाही-शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे.
एअरटेल गॅलरीत महिला कर्मचाऱ्याने मराठी बोलण्यास नकार देत तरुणाशी वाद घातल्यानंतर पुन्हा एकदा भाषेचा मुद्दा तापला आहे. अंधेरीतील चारकोप येथे एअरटेलच्या गॅलरीत महिला कर्मचाऱ्याने मराठी तरुणाशी वाद घालताना आपण मराठीत बोलणार नाही अशी मुजोरी दाखवली.तरुणाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी एअरटेल प्रशासनाची भेट घेत मराठीवर असा भेदभाव केला तर यापुढे एकही गॅलरी दिसणार नाही असा इशारा दिला आहे.
एअरटेलच्या गॅलरीत आणि कॉलिंग यात मराठी पर्याय ठेवायला काही समस्या आहे का? मग नेमकी काय समस्या आहे की, एअरटेलच्या गॅलरीत मराठी बोलणारे तरुण किंवा तरुणी नसतात. यामागे काही तरी कारण आहे का? अशी विचारणा अखिल चित्रे यांनी एअरटेलच्या अधिकाऱ्याला केली. त्यावर संबंधित एअरटेलचा अधिकारी मराठी मुलं नाहीत असं नाही असं उत्तर देतो. त्यावर अखिल चित्रे त्यांना काल जो प्रकार घडला त्याची आठवण करुन देतात.”मग काल जो प्रकार घडला त्या गॅलरीत एकही मराठी बोलणारा का नव्हता? एअरटेलच्या दिल्ली प्रशासनाची एकदा काचा फुटल्या होत्या तसं आंदोलन पुन्हा व्हावं अशी इच्छा आहे का?. एअरची टेल खेचून त्यांना खाली आणायचं आहे का?,” अशी विचारणा ते करतात.फोन केल्यानंतर इंग्लिश, मराठीचा पर्याय निवडला तरी समोरची व्यक्ती हिंदीतच बोलते. हिंदी भाषिकांना नियुक्त केल्यामुळे मराठी मुलांना रोजगार मिळत नाही. महाराष्ट्रात सर्वात जास्त सबस्क्रिप्शन असताना, मराठी बोलणारे असंख्य ग्राहक असताना आम्ही मोहीम चालवावी असं वाटत आहे का? की दुसरं नेटवर्क घ्यावं अशी इच्छा आहे. मराठीवर असा भेदभाव केला तर यापुढे एकही गॅलरी दिणार नाही,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.