
दापोलीत हॉर्नबिलच्या पहिल्या घरट्याचा लागला शोध
दापोली १२:- दापोलीत हॉर्नबिलच्या पहिल्या घरट्याचा शोध वाईल्ड ऍनिमल रिस्क्युअर संघटने लावला आहे.दापोलीच्या हिरवाईत एका दुर्मिळ क्षणाची नोंद झाली – मलबार पाइड हॉर्नबिलच्या पहिल्या घरट्याचा शोध काळ्या-पांढऱ्या रंगाचा हा राजस पक्षी, त्याच्या डौलदार चोचीसह, निसर्गाच्या गूढ कथांची आठवण करून देतो. घनदाट जंगलात गूढ भासणारा त्याचा आवाज आणि पानांतून झेपावताना होणारा फडफडाट, हीच खरी निसर्गसंगीताची अनुभूती. मात्र, आधुनिकतेच्या वादळात हे सृष्टीचे रत्न हरवू नये, म्हणून आपणच सजग राहिले पाहिजे.ही केवळ नोंद नव्हे, तर जबाबदारीची साद आहे.
हॉर्नबिल ही केवळ एक प्रजाती नाही, तर जंगलाचे संतुलन राखणारा एक प्रमुख दुवा आहे. त्यांचे घरटे शोधणे, त्यांचे संरक्षण करणे आणि निसर्गाचा वारसा पुढच्या पिढींसाठी जपणे हेआपले कर्तव्य आहे.दापोलीतील या घरट्याचा शोध म्हणजे एक सकारात्मक संकेत.जर दापोली तालुक्यात कुठेही हॉर्नबिलचे घरटे दिसले, तर खालील क्रमांकावर कळवा.तुषार महाडिक 9049440914 सतीश दिवेकर 9307674632मिलिंद गोरीवले 97644 54454