
चिपळूणमधील पुलावरील गर्डर कोसळल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला 50 लाखाचा दंड.
चिपळूणमधील पुलावरील गर्डर कोसळल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला 50 लाखाचा दंड केला असून आराखडा बनवणाऱ्या अभियंत्याला 20 लाखाचा दंड केला आहे.जानेवारी 2026 अखेर हा पूल पूर्ण होईल. या महामार्गाच्या दर्जाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत; परंतु दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही तरी क्वालिटी कंट्रोल विभागाकडून याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.