
गुहागर तालुक्यातील परचुरी-भूरकुंडा येथे सहा ब्रास वाळू जप्त
. गुहागर तालुक्यातील परचुरी-भूरकुंडा येथे महसूल विभागाने कारवाई करत ६ ब्रास वाळू जप्त केली. शनिवारी रात्री १ वाजता ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून दाभोळखाडी येथील परचुरी-भूरकुंडा येथे सक्शन पाईपच्या माध्यमातून वाळू उपसा व वाहतूक जोरदारपणे सुरू असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांतून गुहागर महसूल विभागाकडे येत होत्या.
या तक्रारीची दखल घेत गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी मंडल अधिकारी भरत जाधव, तलाठी हनुमंत भिसे यांच्यासह शनिवारी भरत जाधव, तलाठी हनुमंत भिसे यांच्यासह शनिवारी रात्री सुमारे १ वाजता त्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. यामध्ये त्यांना परचुरी भुरकुंडा येथे सुमारे ६ ब्रास वाळूचा साठा खाडीकिनारी आढळून आला. हा वाळू साठा महसूल विभागाने जप्त करून येथील पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिला आहे. दरम्यान एका खाजगी व्यक्तीच्या जमिनीमध्ये हा वाळूसाठा मिळून आला असून नक्की कोणी आणला याची माहिती महसूल विभागाला मिळालेली नाही.www.konkantoday.com