
चिपळुणात महिलेची हजारोंची ऑनलाईन फसवणूक, अज्ञातावर गुन्हा दाखल
मोबाईलवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर यातूनच एका महिलेच्या खात्यातून ५ हजाराचे ५ ट्रान्झेक्शन होवून २५ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाली. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात सोमवारी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला.
या बाबतची फिर्याद एका महिलेने दिली. ही महिला घरी असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने एक एसएमएस पाठवून एमबीऍक्टिव्हेट नावाने इंग्रजी भाषेतएक मेसेजची लिंक पाठवली. या लिंकवर जावून त्या महिलेने क्लिक केले असता त्यांना त्यांच्या मोबाईलवर ऍप्रुव्ह म्हणून मेसेज दिसला. त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्या महिलेच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चिपळूणच्या सेव्हिंग्ज खात्यामधून ५ हजार रूपयांची एकूण पाच व्यवहार होवून त्यांच्या खात्यामधून २५ हजार युपीआय आयडी क्रमांकाने त्या अज्ञात व्यक्तीच्या खात्यामध्ये वळते झाले आहेत.
हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी चिपळूण येथील पोलीस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार त्या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com