
कोकणात येणार्या चाकरमान्यांना खुशखबर, कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून चाकरमान्यांचा प्रवास सुसाट.
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीतील दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले झाल्याने चाकरमान्यांना ग्रामदेवता पावल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये, याकरिता तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे ११ के.व्ही. क्षमतेच्या विजेची मागणी केली असता त्यापोटी ८० लाख रुपयांची अनामत रक्कम भरणा करण्याबाबत सूचित केले होते. अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने शिमगोत्सवात दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली होती.www.konkantoday.com