
रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आणि आदर्श विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज wathul तालुका राजापूर येथे paramedical कोर्स विषयी जनजागृती..
दिनांक 11 मार्च 2025 रोजी आदर्श विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ wathul तालुका राजापूर dist -Ratnagiri येथे. संस्था पदाधिकारी पालक संघटना आणि शिक्षक यांच्या वतीने सहविचार सभा घेण्यात आली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असता आदर्श विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज wathul येथे सुरू असलेल्या DMLT(Diploma Medical lab technician) paramedical कोर्स बद्दल व इतर अनेक कोर्स संधर्भात रॅलिस फाउंडेशन च्या संचालिका सौ अंजली पवार यांनी महत्त्व पूर्ण माहिती दिली. पॅरामेडिकल course का करावे. भविष्यामध्ये या पॅरामेडिकल कोर्स ची कोरोना नंतर वाढत असलेली मागणी व मुलांचे उज्वल भविष्य याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. आपले सर्व सामान्य पालक या सर्व गोष्टींपासून वंचित असतात. या पॅरामेडिकल कोर्सना अमाफ फी असल्यामुळे मुलांना पालक पाठवू शकत नाही. मात्र काही संस्था कमी फी मधे अश्या कोर्स उपलब्ध करून देतात. त्या पैकी एक रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट होय.
या कार्यक्रमामध्ये आदर्श विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ wathul तालुका राजापूर संस्थेचे सर्व पदाधिकारी श्री विजय चव्हाण सर, संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र सावंत. आणि विश्वासराव चव्हाण, मुख्याध्यापक नंदकिशोर कामत सर, श्री संदीप मयेकर सर, व इतर शिक्षक व कर्मचारी पालक वर्ग आणि रॅलिस फाउंडेशन चे अध्यक्ष श्री अण्णा पवार उपस्थित होते.तरी या सभेला पालकांचा व ग्रामस्थांचा उस्पुर्थ प्रतिसाद मिळाला व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.. .. ..