
रायगड जिल्ह्यातील जंगलांमध्ये बॅगेत भरलेला मृतदेह आढळल्याने खळबळ.
रायगड जिल्ह्यातील जंगलांमध्ये बॅगेत भरलेल्या मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. पेण तालुक्यातील दुरशेत जंगल भागातील रस्त्यावर एक बॅग संशायस्पदरित्या ठेवण्यात आली होती, या बॅगेबाबत स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क केला, तेव्हा बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला.हा मृतदेह कुणीतरी बाहेरून येऊन फेकून दिल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपास पेण पोलीस करत आहेत.
दुरशेत गावाच्या सरपंच दशरथ गावंड यांनी सकाळी 10-10.30 वाजता दुरशेत येथे बाळगंगा नदीच्या किनारी काळ्या रंगाच्या सुटकेसमधून दुर्गंधी येत असल्याचं पोलिसांना कळवलं. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना 30 ते 40 वर्षांच्या महिलेचा मृतदेह बॅगमध्ये सापडला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे हत्येला 4-5 दिवस झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.