
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील नवकार प्लाझा तेथील केकचे दुकान चालविणाऱ्या तरुणाची आत्महत्या.
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील नवकार प्लाझा तेथील केकचे दुकान चालवण्यासाठी घेतलेल्या तरुणाने बाजुच्याच तो रहात असलेल्या रुममध्ये अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली.ही घटना सोमवार 10 मार्च रोजी सकाळी 10.15 वा. सुमारास उघडकीस आली.प्रदिप धर्माप्पा बल्याणअली (34 मुळ रा.कर्नाटक सध्या रा.नवकार प्लाझा,रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या कर्मचार्याचे नाव आहे. याबाबत त्याच्या दुकानातील कर्मचारी दिवेश श्रीपत मांडवकरने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.
त्यानुसार, सोमवारी सकाळी तो दुकानातील साफसफाईचे काम करण्यासाठी आला होता. परंतू त्याला प्रदिप बल्याणअली कोठेही दिसून न आल्याने त्याने त्याच्या मोबाईलवर फोन केला. प्रदिपने फोन न उचलल्याने श्रीपतने दुकानाच्या बाजुच्याच प्रदिप रहात असलेल्या रुमच्या खिडीकीतून आतमध्ये पाहिले असता त्याला प्रदिप रुमच्या छताच्या फॅनला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.