
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून हापूस आंब्याच्या थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून हापूस आंब्याच्या थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांतर्गत राज्यात विविध ठिकाणी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याला ग्राहकांचा नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आंबा हंगाम २०२५ करिता आंबा उत्पादकांना थेट विक्री सुविधा उपलब्ध होण्यासाठी पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये आंबा उत्पादकांची स्टॉल नोंदणी सुरू आहे.स्टॉल नोंदणीसाठी आंबा नोंदीसह ७/१२ उतारा (मागील ६ महिने कालावधीतील) आधारकार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणार्या कुटुंबातील व्यक्तीचे आधारकार्ड प्रत व भौगोलिक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र प्रत, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे नावे रु. १०,००० अनामत रक्कमेचा धनाकर्ष अथवा यापूर्वी अनामत रक्कम भरणा केली असल्यास पावतीची प्रत, तसेच विहित नमुन्यातील अर्ज व हमीपत्र इ. कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत.
चालू वर्षीपासून आंब्यासाठी जीआय स्टीकर अनिवार्य करण्यात आला आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांतर्गत आंबा महोत्सवामध्ये सहभागी होवू इच्छीणार्या आंबा बागायतदारांनी नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, रत्नागिरीचे कृषी व्यवसाय पणन तज्ञ पवन बेड (७२१८३५००५४) व व्यवसाय पणन तज्ञ राजवर्धन कदम (७२१८८१७७९९) यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन कृषी पणन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.www.konkantoday.com