
मध्य रेल्वे होळी उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दादर- रत्नागिरी अनारक्षित होळी विशेष ट्रेन
कोकण रेल्वे मार्गावर मुंबईवरुन कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना नेहमीच गर्दी असते. विशेषतः कोकणातील गणेशोत्सव आणि शिमगोत्सव या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि यात ट्रेनचे तिकीट न मिळणे, रेल्वेला प्रचंड गर्दी यामुळे चाकरमान्यांचे हाल होतात.याच पार्श्वभूमीवर कोकणात गावी येण्यासाठी मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई येथील चाकरमान्यांना सोप व्हावे यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे होळी उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दादर- रत्नागिरीअनारक्षित होळी विशेष ट्रेन चालवणार आहे.
होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाडी संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार दादर रत्नागिरी (01131) होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी ती रत्नागिरीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात रत्नागिरी -दादर होळी विशेष गाडी (01132 ) दि. १२, १४ तसेच १७ मार्च २०२५ रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुपारी १ वा. २५ मिनिटांनी दादरला पोहोचणार आहे.
एकूण १६ डब्यांच्या या अनारक्षित होळी विशेष गाडीला सर्वसाधारण श्रेणीचे १४ तर सीटीग कम लगेजचे दोन असे डबे असतील. ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे रोड, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबे देण्यात आले आहे.