
बाळाला चुकीचा डोस, परिचारिकेला नोटीस, आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना.
नियमित डोस घेण्यासाठी आलेल्या साडेतीन महिन्यांच्या बाळाला चुकीचा डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार दापोली तालुक्यातील आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाने संबंधित परिचारिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.१८ फेब्रुवारी रोजी बाळाला डोस देण्यासाठी गावातील ़एक महिला माता आंजर्ले शासकीय दवाखान्यात वेगवेगळे तीन डोस बाळाला देण्यासाठी गेली होती. त्यावेळी बाळाला एक डोस चुकीचा दिला गेला. गरोदर महिलेला जे टीटीचे डोस दिले जातात, तो डोस बाळाला दिला गेला. त्यानंतर बाळाला प्रचंड त्रास होवू लागला. दापोली येथे उपचार केल्यानंतर आता बाळ बरे असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.www.konkantoday.com