
पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांचा काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश.
पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं.त्यांचा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत मंत्री उदय सामंत, उपसभापती नीलम गोऱ्हे, प्रकाश सुर्वे हे उपस्थितीत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आता लोकांना धंगेकर कोण आहे ते कळेल, असे ओपन चॅलेंज केले.
रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी रवींद्र धंगेकर यांचे शिवसेनेत स्वागत केले. रवींद्र धंगेकर यांचा प्रवास नगरसेवकापासून आमदारापर्यंत झाला. ते एक आदर्श कार्यकर्ता आहेत. ते १० वर्ष शिवसेनेचे नगरसेवक होते. आता ते पुन्हा स्वगृही आले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.