
खेड नगर परिषदेच्या हद्दीतील मुख्य बाजारपेठेतील नाला कचर्याने तुंबला.
खेड नगर परिषदेच्या हद्दीतील मुख्य बाजारपेठेतील नाल्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. नाल्यातून सतत वाहणार्या पाण्याचा अडसर कॉंक्रीटीकरण कामात येवू नये, यासाठी खडीयुक्त सिमेंटच्या पिशव्यांनी सांडपाणी अडवले जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाल्यात सांडपाण्यासह प्लास्टिक कचर्याचा खच साचल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.शहरातील मुख्य बाजारपेठेसह खांबतळे, हनुमान पेठ, संत रोहिदासनगर, मीनाताई ठाकरे बसस्थानक, वाणीपेठ परिसरातून गटारांद्वारे वाहून येणारे सांडपाण्याचा नाल्यातून निचरा होतो.
या पाण्याची जगबुडी नदीकिनारी विल्हेवाट लावली जाते. बाजारपेठेतील वर्दळीच्या ठिकाणी असलेला नाला अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला आहे. सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. नाल्याच्या नुतनीकरणासाठी निधी प्राप्त होताच काम देखील ठेकेदाराने हाती घेतले आहे. नाल्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम जगबुडीच्या बाजूने निवाचा चौक येथील नाल्यालगत करण्यात आले आहे. कॉंक्रीटीकरणाच्या कामात नाल्यातून सतत वाहणार्या सांडपाण्याचा अथडळा थांबवण्यासाठी खडी व वाळूयुक्त सिमेंट पिशव्या आडव्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाल्यातील सांडपाणी मागील बाजूच तुंबले आहे.www.konkantoday.com