
कारला धडक देणार्या इनोव्हा चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील पावस-रत्नागिरी रस्त्यावरील फणसोप येेथे कारला धडक देवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या इनोव्हा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली होती. अक्षय सतीश सुर्यवंशी (२६) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
तक्रारदार प्रेम रजनीकांत पवार हे २८ रोजी कार (एम.एच. ०८ एएक्स ९८३०) घेवून रत्नागिरी ते पावस असे जात होते. यावेळी मागून येणार्या इनोव्हा कारने (एमएच १४ डी एन ३१४८) पाठिमागून प्रेम पवार यांच्या कारला धडक दिली. पोलिसांनी या प्रकरणी इनोव्हा चालक अक्षय याच्याविरूद्ध निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com