
उक्षी येथे नारळ चोरांचा सुळसुळाट, झाडावरील 250 नारळ चोरले.
रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथील फार्महाउस येथील 20 नारळांच्या झाडांवरील 6 हजार 750 रुपयांचे तब्बल 250 नारळ अज्ञाताने लांबवले. ही घटना रविवार 9 मार्च रोजी मध्यरात्री 2.30 ते 3.30 वा.कालावधीत घडली आहे.याबाबत संदेश चंद्रकांत जोशी (39, रा. उक्षी जोशीवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संदेश जोशी यांचे उक्षी येथे मातोश्री नावाचे फार्महाउस आहे. रविवारी मध्यरात्री या फार्महाउसमधील एकूण 20 नारळांच्या झाडांरील 200 ते 250 नारळ अज्ञाताने काढून नेले