
इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा कारखाना आणणार, आ. किरण सामंत यांचे पंतप्रधानांना पत्र.
रत्नागिरी जिल्ह्यासह रत्नागिरी, लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी येथे रोजगार निर्मिती होणे आवश्यक, यासाठीच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून टेस्लासारखा इलेक्ट्रीकल व्हेईकल निर्मितीचा कारखाना जिल्ह्यात आणण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री ना. देवेेंद्र फडणवीस, उपमुग्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, ना. अजित पवार यांनीही आपल्याला पाठिंबा दर्शविला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला रस्ता, जलमार्ग, हवाई मार्गाची सुविधा उपलब्ध असल्याने मुंबईनंतर रत्नागिरीतच अशा प्रकारचा उद्योग उभारू शकतो, अशी सर्वांची खात्री झाल्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्यात आणण्यात आपल्याला निश्चित यश येईल, असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मुंबईतील अर्थसंकल्पीय दोन दिवस सुट्टी असल्याने आ. सामंत शनिवारी रत्नागिरी तालुक्याच्या दौर्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली.www.konkantoday.com