नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १४ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला खेड पोलिसांकडून ठाणे येथून अटक.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १४ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला खेड पोलिसांकडून ठाणे येथून अटक करण्यात आली. शशिकांत बिठ्ठल मिरजकर (रा. भाईदर ईस्ट जि. ठाणे) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.तक्रारदार यांना संशयिताने फोन करून तुम्ही तुमचे पैसे माझ्याकडे गुंतवणूक करा तुम्हाला जास्तीतजास्त रकमेचा परतावा देण्यात येईल असे आमिष दाखविले होते. या अमिषाला बळी पडून तक्रारदार यांनी २०१९ ते २०२३ या कालावधीत १४ लाख २८ गुंतवणूक केली होती.

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी ऑनलाईन फसवणूक केली म्हणून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयातील संशयिताचा तांत्रिक गोष्टीवरून व बँकेच्या माहितीच्या आधारे शोध घेत असताना सदर संशयित हा नवघर, मिरा भाईंदर जि. ठाणे येथे असल्याचे तपासात निष्पन्न झालेले होते. सदर कामगिरी पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, हवालदार दीपक गोरे, रुपेश जोगी, वैभव ओहोळ, राम नागुलवार, टेक्नीकल ॲनालेसिस ब्रांच मधील हवालदार रमिज शेख यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button