
जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या चिपळूण तालुका अध्यक्ष पदी श्री.राजेंद्र पवार तर सचिव पदी नरेंद्र चव्हाण यांची जिल्हाध्यक्ष डॉ परशुराम निवेंडकर यांचे उपस्थितीत झाली निवड.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना तालुका शाखा चिपळूण ची सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष डॉ परशुराम निवेंडकर यांचे अध्यक्षते खाली चिपळूण पाग येथे संपन्न झाली तालुक्यातील बहुसंख्य महिला पुरुष कर्मचारी या वेळी उपस्थित होते. या वेळी तालुक्यातील पदोन्नती झालेल्या सहकारी कर्मचारी यांचा तालुका संघटनेच्या वतिने गौरव कारण्यात आला. तसेच उपस्थितामधून नूतन तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
या मध्ये विस्तार अधिकारी श्री आर. के पवार यांची अध्यक्ष तर श्री. नरेंद्र चव्हाण यांची सचिव पदि निवड करण्यात आली तर कोषाध्यक्ष पदी श्री. भूपेश जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली इतर तालुका पदाधिकारी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष श्री.निलेश आढाव व श्रीम. रोहिणी राठोड, कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र मोळाज, सहसचिव श्रीम. पूर्वा मदगे, तालुका संघटक – श्री. कैलास बाविस्कर, श्री. गजानन इरकर, श्री. रवींद्र पाटील, श्री. देवेंद्र साळवी, श्री. विनोद जाधव, श्री. उमेश मोहिरे, श्री. अनंत भुवड, श्री. दीपक लिंगायत यांची निवड करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री नरेंद्र चव्हाण व विनोद जाधव यांनी केले प्रस्तावना माजी अध्यक्ष श्री विजय चव्हाण यांनी केली शेवटी श्री गांधी यांनी सर्व पदाधिकारी व उपस्थित सभासद यांचे आभार म्हणाले.या सभेला जिल्ह्याचे वतीने राज्य संघटक श्री. गजानन साळुंखे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री. कमलेश लाकडे कोषाध्यक्ष श्री संजय कळंबटे उपस्थित होते