
देवरूख परिसरातील माजी सैनिकांचा रत्नागिरी भाजयुमोने केला सन्मान
रत्नागिरी : भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांच्या हस्ते देवरूख परिसरातील माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने चीन विरुद्ध केलेल्या पराक्रम त्यामुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला आहे. सैनिकांमुळे आपला देश सुरक्षित आहे, अशा सैनिकांचे गुणगान करण्यासाठी सन्मान करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा संगमेश्वर तालुक्यातील देवरूख परिसरातील सैनिकांचा सन्मान कर्यक्रम त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना सोबत आयोजित करण्यात आले.
या वेळी पुंडलिक पवार, भाऊ खेडेकर, अमर चाळके, सुभाष मोरे, महेश सावंत, सुरेंद्र भोंदे, प्रमोद जोशी, बंडू जोशी, सुनिल जाधव या सैनिकांचा गौरव करण्यात आला.
भाऊ खेडेकर यांनी मोदी सरकार देशासाठी आणि भारतीय सैन्यासाठी खुप चांगले निर्णय घेत आहेत, पुढे देखील राष्ट्र बळकटी साठी आमच्या सदिच्छा सोबत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना पुंडलिक पवार यांनी तालुका सैनिक संघातर्फे भाजपाचे आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ नेते मुकुंद जोशी, युवा मोर्चा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, जिल्हा चिटणीस हर्ष दुडे, उपाध्यक्ष रूपेश कदम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तुकाराम किर्वे, युवा नेते भगवतसिंह चुंडावत, युवा तालुकाध्यक्ष राजेंद्र गवंडी, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, नगरसेविका रेश्मा किर्वे, नगरसेवक यशवंत गोपाळ, शहराध्यक्ष सुधीर यशवंतराव, युवा शहराध्यक्ष प्रथमेश धामणस्कर, गुरव आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com