
कोकणातील काजू पिकाला सातत्याने विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतोय.
कोकणातील काजू पिकाला सातत्याने विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षामध्ये अवेळी पडणारा पाऊस, तापमान वाढ यांसह टी मॉस्किटो, फळ पोखरणारी अळी आणि खोंडकिडा यांसारख्या किडरोगांच्या प्रादुर्भाव आदींचा सामना करावा लागत आहे. किडरोगांवर उपाययोजना करणे शक्य आहे.
मात्र, प्रतिकूल हवामान आणि वाढत्या तापमानावर काय करायचं? असा गहन प्रश्न शेतकरी अन् काजू बागायतदारांसमोर ठाकला आहे. त्यातून, बिघडणाऱ्या जमा-खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी धडपडत असताना हापूस आंब्यासोबत हमखास (उत्पन्न) मिळवून देणारं हे पिक कसं संरक्षित करायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे.